Belagavi

आ. रमेश जारकीहोळी यांचे डीकेशींना ओपन चॅलेंज !

Share

मी कोण आणि माझ्यासमोर डी. के. शिवकुमार कोण लागून गेलेत? हवा तर खुला मुकाबला होऊ दे, कनकपूरच्या त्या पठ्ठ्याला निकालादिवशी दाखवून देतो असे ओपन चॅलेंज माजी मंत्री . रमेश जारकीहोळी यांनी डीकेशींना आज दिले.

होय, विधान परिषद निवडणूक जसजशी जवळ येतीय तसतसा भाजप-काँग्रेसच्या बिनीच्या नेत्यांमध्ये जोरदार रणकंदन माजत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आ. रमेश जारकीहोळी यांची बंडखोर म्हणून संभावना केली होती. त्याला आज रमेश यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे भाजपचा प्रचार करताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे महांतेश कवटगीमठ विजयी व्हावेत यासाठी जिल्ह्याचा कानाकोपरा पिंजून काढत आहे. डीकेशींच्या कुठल्याही आरोपाला मी आता उत्तर देणार नाही. निवडणूक निकालादिवशी, १४ डिसेंबरला त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचे, आरोपांचे उत्तर मिळेल. आम्ही सध्या निवडणुकीच्या मूडमध्ये आहोत. निकाल लागू दे, डीकेशींची सगळी पोलखोल करतो. १९८५ पासूनची कुंडली मांडतो, डीकेशी कुटुंब, जारकीहोळी कुटुंब कोण होते, काय होते सगळे जाहीर करतो असे खुले आव्हान आ. रमेश जारकीहोळी यांनी दिले.

दिल्लीतील वरिष्ठांचा आशीर्वाद मला आहे. त्याच्यामुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा आतापर्यंत यांनी मला षड्यंत्र रचून संपवले असते. संघ परिवारातील नेत्यांच्या पाठिंब्यानेच मी नेता झालो आहे असे आ. रमेश म्हणाले.

ब्लॅकमेल कोण करते हे १४ तारखेलाच सांगतो. त्यादिवशी डीकेशी-जारकीहोळी यांच्या ओपन वॉर होऊद्या, आधी विधान परिषद तर वाचवा असा खोचक सल्ला देत रमेश यांनी डीकेशींना खुले आव्हान दिले.

 

 

Tags: