Belagavi

‘तो’ लखन यांचा वैयक्तिक विषय !

Share

 बेळगावात अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणूक लढविणे हा लखन यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी हे आमच्या पक्षाचे, ते भाजप उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करतील असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.

बेंगळुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, भाजपचे उमेदवार नंबर वनमध्ये निवडून येतील. लखन जारकीहोळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. ते आमच्या पक्षात नाहीत, त्यांचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी यांच्याशी बोलून हा विषय समजून घेईन. मात्र रमेश जारकीहोळी यांनी आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या उमेदवाराला कसली अडचण येणार नाही. रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी हे भाजप उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करतील. याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Tags: