Vijayapura

सुनीलगौड पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी

Share

विजापूर बागलकोट अवळी जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी सुनीलगौड पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली असून आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अविभाजित जिल्ह्यातील मुत्सद्दी राजकारणी, कट्टर काँग्रेसवादी, दिवंगत बी. एम. पाटील यांचे द्वितीय पुत्र, माजी मंत्री, काँग्रेस नेते आणि एम. बी पाटील यांचे बंधू सुनीलगौडा पाटील यांनी आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्या इन न्यूजच्या प्रतिनिधीशी त्यांनी संपर्क साधला.

केवळ तीन वर्षांच्या काळात मतदान करणाऱ्या प्रत्येक ग्राम पंचायतीला त्यांनी भेट दिली आहे. तीन वर्षांच्या काळात पहिल्या वर्षी त्यांनी पीडितांना मदत केली. त्यांना मूलभूत सुविधा पुरविल्या. कोरोनाकाळात देखील ते मदतीसाठी धावून गेले. आपल्याला मिळणाऱ्या अनुदानातून तसेच स्वखर्चातून सॅनिटायझेशन करून अनेक गावामध्ये स्वच्छता अभियान देखील राबविले. या साऱ्या कार्याची दखल घेऊन नक्कीच आपला विजय होईल, अशी आशा सुनीलगौड पाटील यांनी व्यक्त केली.

Tags: