Belagavi

एक-दोन दिवसांत भाजपात प्रवेश करणार : विवेकराव पाटील

Share

येत्या एकदोन दिवसांत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती माजी विधान परिषद सदस्य जिल्हा केएमएफचे अध्यक्ष विवेकराव पाटील यांनी दिली.

मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना विवेकराव पाटील म्हणाले, लखन जारकीहोळी यांचा विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी येथे आलो आहे. मतदारांनी पहिल्या पसंतीचे मत भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ याना देऊन दुसऱ्या पसंतीचे मत लखन जारकीहोळी याना द्यावे असे आवाहन केले. आ. रमेश जारकीहोळी यांनी मला भेटून भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार येत्या एक-दोन दिवसांत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहे असे ते म्हणाले.

 

Tags: