Belagavi

लखन जारकीहोळी अपक्ष म्हणून रिंगणात !

Share

 विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लखन जारकीहोळी यांनी अपक्ष म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

होय, बेळगावात मंगळवारी सकाळी लखन जारकीहोळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लखन जारकीहोळी हे भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपने विध्यांनी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लखन जारकीहोळी यांनी अखेर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. .

दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी बोलताना आपण कोणत्या पक्षाचा बंडखोर उमेदवार नाही, तर अपक्ष उमेदवार असल्याचे स्पष्टीकरण दिले. मी निवडणूक लढविणार असल्याने भाजपला फायदा होईल दुसऱ्या पक्षाला नुकसान होईल असा अपप्रचार करण्यात येत आहे तो चुकीचा आहे असे लखन जारकीहोळी यांनी सांगितले. मी कधीही भाजपकडे उमेदवारी मागितली नव्हती, याबाबत उगाच गोंधळ निर्माण झाला आहे. आधीपासूनच मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मला मत देऊन निवडून दिल्यास, विकास करण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. कार्यकर्ते आणि मतदारांचा पाठिंबा मला आहे. त्या भरवशावरच मी निवडणूक लढवत आहे असे लखन जारकीहोळी यांनी सांगितले. बाईट

 

 

 

Tags: