कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हा व राज्य अध्यक्षपदाकरिता रविवारी शांततेत मतदान पार पडले.

विजापूर शहरातील जुन्या तहसील कचेरीत कन्नड साहित्य परिषदेच्या जिल्हा व राज्य अध्यक्षपदाकरिता मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. आज रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान घेण्यात आले. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी उमेदवारांकडून मदत कक्ष स्थापन करण्यात आले होते. विजापूर जिल्ह्यात कन्नड साहित्य परिषदेचे एकूण ९७३४ मतदार आहेत.
त्यापैकी अनेकांनी आज मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार हात जोडून मतदारांचे मन वळविण्याचे प्रयत्न करताना दिसून आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Recent Comments