रस्त्यावर फिरणारी गाय चोरून कारमध्ये घालून पळवून नेल्याची खळबळजनक घटना विजापुरात घडली आहे. खळबळ माजवून देणाऱ्या या अनोख्या चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.

होय, विजापुरात चक्क रस्त्यावर फिरणारी गाय चोरून कारमधून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने विजापुरात खळबळ माजली आहे. रात्रीच्या वेळी केलेल्या या चोरीचे दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. याप्रकरणी नवनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Recent Comments