बेळगावच्या केएलई संस्थेच्या राजा लखमगौडा पदवीपूर्व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध उपक्रमांचा उदघाटन समारंभ पार पडला.

आरएलएस कॉलेजच्या सर सी. व्ही. रामन सभागृहात झालेल्या उदघाटन समारंभात समाज कल्याण खात्याच्या संयुक्त संचालिका उमा सालीगौडर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कॉलेजच्या स्थानिक संचालन समितीचे अध्यक्ष एल. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते.

यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उमा सालीगौडर म्हणाल्या, प्रत्येक विध्यार्थ्यांच्या आयुष्यात कॉलेज जीवन खूप महत्वाचे असते. येथूनच तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरवात होते. तुमच्या भविष्याचा पाया कॉलेज जीवनात रचला जातो. त्यामुळे विचारपूर्वक गुरुजनांच्या मार्गदर्शनाने उज्वल भविष्याचा पाया रचा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आरएलएस कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments