चोर्ला घाटात मुसळधार पावसामध्ये फिरणाऱ्या वृद्धावर उपचार करून सदर वृद्धाला कुटुंबीयांप्रमाणे वागणूक देऊन बेळगावच्या सेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी माणुसकीचा संदेश दिला आहे.

गोव्याला जाणाऱ्या चोर्ला घाटात मुसळधार पावसात एक वृद्ध भरकटला होता. सदर वृद्धाची अवस्था अत्यंत दयनीय होती असे सेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले. हि गोष्ट सेवा फाउंडेशनच्या सदस्यांना समजताच फाउंडेशनचे पिरनवाडी ब्लॉक सदस्य आपल्या वाहनातून अमानुल्ला नामक वृद्ध व्यक्तीला बेळगावमधील कॅम्प परिसरात प्रथमोपचाराची घेऊन आले.
यानंतर त्या वृद्धाला अन्न आणि कपड्यांची व्यवस्था करून देऊन ४ दिवस आपल्या कार्यालयात ठेऊन उपचार केले. सदर वृद्धाच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधण्यात फाउंडेशनच्या सदस्यांना यश आले असून धारवाड येथे या वृद्धांचे कुटुंब असल्याचे समजले आहे.


Recent Comments