सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकामध्ये हिंदूंचा अवमान करण्यात आला आहे. या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी करत हिंदू जनजागृती समितीच्यावतीने आज बेळगावमध्ये आंदोलन छेडण्यात आले.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून हिंदूंसंदर्भात अवमानकारक लिखाण केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. यावेळी सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात हिंदू जन्जग्रुती समितीच्या सरिता मुगळी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकामध्ये हिंदू संघटनांचा अवमानकारक उल्लेख केला आहे. ‘वसुधैव कुटुंबकं’ या हिंदुत्ववादाची दहशतवादाशी तुलना करण्यात आली असून हे चुकीचे आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काँग्रेस नेते हिंदू संघटनांना टार्गेट करून बोलत असून बांगला, पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या परिस्थितीबद्दल कोणीही बोलताना दिसत नसल्याबद्दल यावेळी नाराजीही व्यक्त करण्यात आली. या मोर्चामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.


Recent Comments