Belagavi

संत श्री जलाराम फौंडेशनच्या वतीने बेळगावात अन्नदान

Share

 संत श्री जलाराम बाप्पा यांच्या २२२ व्या जयंतीनिमित्त बेळगावात गुरुवारी संत श्री जलाराम फौंडेशनच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

होय, बेळगावात गुरुवारी संत श्री जलाराम बाप्पा यांची २२२ वी जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त महाआरती करण्यात आली. त्यानंतर संत श्री जलाराम बाप्पा यांच्या शिकवणुकीनुसार रेल्वे स्थानक परिसरात असहाय्य लोकांना गरम पुलावा, बुंदीचे लाडू, मोसंबी वाटप करण्यात आले. सुमारे २०० असहाय्य लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. संत श्री जलाराम फौंडेशनच्या वतीने गेल्या ५ वर्षांपासून संत श्री जलाराम बाप्पा यांच्या प्रेरणेने दर गुरुवारी अन्नदान करण्यात येते.

यावेळी संत श्री जलाराम फौंडेशनचे अध्यक्ष कन्नुभाई ठक्कर, चिमणभाई ठक्कर, शारदाबेन, उज्ज्वलाबेन, कोकिळाबेन, स्नेहलबेन, ललितभाई. किरणभाई, बिपिनभाई, अश्विन भाटिया यांच्यासह अनेक भक्तांनी महाआरती व अन्नदान उपक्रमात भाग घेतला.

 

 

Tags: