Belagavi

पुनीत राजकुमार चाहत्यांचे आंदोलन : बेळगावमधील प्रमुख रस्त्याला नाव देण्याचा आग्रह

Share

ळगावमधील एका प्रमुख रस्त्याला पुनीत राजकुमार यांचे नाव देण्यात यावे, वंटमुरी चौकाचे नामकरण पुनीत राजकुमार असे करण्यात यावे, तसेच त्याठिकाणी पुनीत राजकुमार यांचा पुतळा स्थापन करण्यात यावा, असा आग्रह करत बेळगावमध्ये कन्नड संघटनांनी आंदोलन केले.

व्हॉइस : बेळगावमधील पुनीत राजकुमार चाहते, राजवंश युवा सेना आणि काही कन्नड संघटनेच्या सहयोगाने छेडण्यात आलेल्या आंदोलनात उपरोक्त मागण्या करण्यात आल्या असून यासाठी आज शहरातील चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते दीपक गुडगनट्टी बोलताना म्हणाले, पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापुढे सूर्यचंद्र नावाने संबोधून बेळगावमधील मुख्य रस्त्याला पुनीत राजकुमार यांचे नाव देण्यात यावे, तसेच वंटमुरी सर्कलचे नामकरण पुनीत राजकुमार असे करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन आम्ही आज सादर केले आहे.

पुनीत राजकुमार यांच्या निधनाला अवघे काही दिवसच लोटले आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यानी विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहिली असून त्यांचे सतत स्मरण राहण्यासाठी आता बेळगावमधील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात यावे, असा आग्रह करण्यात आला आहे.

Tags: