बेळगावातील आनंदनगर–वडगाव दिवाळीनिमित्त येथे शिवप्रेमी युवकांनी पुढाकार घेऊन किल्याचे स्वप्न साकार केले. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

दिवाळीनिमित्त आनंदनगर-वडगाव येथील शिवप्रेमी युवकांनी पुढाकार घेऊन किल्याचे स्वप्न साकार करून छत्रपती शिवरायांच्या कार्याला उजाळा दिला. नगरसेविका सारिका पाटील, युवराज मुचंडी, शिवाजी मुचंडी, महादेव चिठ्ठी, देसाई मॅडम, वनिता अतिवाडकर, आरती तमुचे, स्वाती मंडोळकर, सोनाली पाटील, लाड मॅडम, सुनिता पाटील, विद्या मुचंडी, संतोष हुंदरे या सर्वानी मिळून किल्ल्याचे उदघाटन केले . त्यावेळी वेगेवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. संगीत खूर्ची, लिंबू चमचा, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये भरपूर स्पर्धक सहभागी झाले होते.


Recent Comments