Belagavi

रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न; सतर्क नागरिकांनी वाचवला जीव

Share

 रेल्वे रुळावर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एकाचे सतर्क नागरिकांनी रक्षण केल्याची घटना बुधवारी सकाळी बेळगावातील टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे गेटजवळ घडली.

होय, टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेटकडून पहिल्या गेटकडे बुधवारी सकाळी एक रेल्वे संथगतीने येत होती. त्यावेळी सुमारे ४५ वर्षांच्या एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही सतर्क नागरिकांनी त्याच्याकडे तातडीने धाव घेत त्याला उचलून बाजूला केले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याला तातडीने जिल्हा इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या व्यक्तीचे नाव समजून आलेले नाही. बेळगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

 

Tags: