Belagavi

महापौर-उपमहापौरांच्या निवडीसाठी प्रादेशिक आयुक्तांना साकडे !

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरउपमहापौरांची निवडणूक तातडीने घेण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर केले

होय, बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन अडीज महिने लोटले आहेत. सरकारने या पदांसाठीचे आरक्षणही जाहीर केले आहे. मात्र अजूनही महापौर-उपमहापौरांची निवडणूक घेण्यात आलेली नाही. आता लवकरात लवकर ही निवडणूक घेऊन सार्वजनिक कामांत भाग घेण्याची संधी द्यावी असे आवाहन प्रभाग क्र. २७चे नगरसेवक रवी साळुंके, प्रभाग क्र. १४चे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रभाग क्र. १० च्या नगरसेविका वैशाली भातकांडे, प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका पूजा पाटील आणि प्रभाग क्र. ७चे नगरसेवक शंकर पाटील यांनी आज बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन हे निवेदन दिले. फ्लो यासंदर्भात माहिती देताना प्रभाग क्र. २७चे नगरसेवक रवी साळुंके म्हणाले, पालिकेची निवडणूक होऊन अडीज महिने लोटले आहेत. मात्र अद्याप महापौर-उपमहापौरांची निवडणूक न झाल्याने पालिकेच्या कामकाजाला गती आलेली नाही. त्यामुळे प्रभागांत अनेक कामे तुंबली आहेत. त्यामुळे महापौर-उपमहापौरांची निवडणूक तातडीने घेण्याच्या मागणीचे निवेदन प्रादेशिक आयुक्तांना दिले आहे.

कोरोना संकटामुळे व अन्य काही कारणांनी बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक मुळातच उशिरा  घेण्यात आली. त्याला अडीज महिना लोटला आहे. सरकारने आरक्षण जाहीर करूनही बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही महापौर-उपमहापौरांची निवडणूक घेण्यात न आल्याने विकासकामे खोळंबली आहेत. आता नगरसेवकांच्या मागणीनंतर तरी सरकार महापौर-उपमहापौरांची निवडणूक घेणार का हाच खरा प्रश्न आहे.

 

 

 

Tags: