बेळगाव तालुक्यातील मंडोळी, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द आणि कंग्राळी बुद्रुक या चार गावात डिजिटल ग्रंथालये सुरु करण्यात येणार आहेत. खा. मंगल अंगडी यांच्याहस्ते या ग्रंथालयाच्या कामांना चालना देण्यात आली.

बेळगावच्या खा. मंगल अंगडी यांच्या विशेष प्रयत्नातून बेळगाव तालुक्यातील मंडोळी, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द आणि कंग्राळी बुद्रुक या चार गावांसाठी डिजिटल ग्रंथालये मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी केंद्र सरकारने प्रत्येकी ४० लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. या ग्रंथालयाच्या कामांना खा. मंगल अंगडी यांनी भूमिपुजन करून चालना दिली. 
याप्रसंगी बोलताना खा. मंगल अंगडी म्हणाल्या, केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय डिजिटल ग्रंथालय योजनेंतर्गत या ४ ग्रंथालयांना अनुदान मंजूर केले आहे. ग्रामीण भागात संगणक साक्षरता वाढण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल भारताचे स्वप्न पहिले. त्यामुळे सरकारी कार्यालये पेपरलेस झाली आहेत. देशातील सर्व यंत्रणा डिजिटल करण्याचा मोदींचा मानस आहे. डिजिटल ग्रंथालयांत सौर उर्जेवर आधारित एअर कंडिशनिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिक जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. त्यामुळे डिजिटल ग्रंथालयांचा उपयोग होईल.
यावेळी विनायक कदम, यत्नेश हेब्बाळकर, लक्ष्मी कणबरकर, एसडीएमसी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रभाकर कट्टीमनी, नारायण शिंदे, चेतन पाटील, भाजप ग्रामीण मंडळ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments