घटप्रभा नदीत मासे पकडायला गेलेला युवक बेपत्ता झाल्याची घटना मुडलगी तालुक्यातील कमलदिन्नी गावाजवळ घडली आहे.

गुरुवारी सायंकाळी मासे पकडायला गेला असताना हा युवक पाण्यात बुडून प्रवाहासोबत वाहून गेला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उदय परशुराम हादीमनी, वय १७ असे या युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरु केले आहे. नंतर रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी सकाळी एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा शोधकार्य सुरु केले आहे असे सांगण्यात आले. बाईटयासंदर्भात मुडलगी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments