नवीन पेन्शन योजना रद्द करावी आणि जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन छेडले तसेच बेळगावात एक दिवसाचा संप पुकारला.

१ एप्रिल २००६ पासून लागू करण्यात आलेली नवी पेन्शन योजना आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य अडचणीत आले असून या नव्या पेन्शन योजनेमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत बेळगावमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप पुकारला. नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, अशी मागणी करत सरकारी कर्मचाऱ्यांनी सांकेतिक सत्याग्रह करत कुटुंबियांसमवेत धरणे आंदोलन छेडले. 
यावेळी सरकारी कर्मचारी संघाच्या संघटना सचिव अंजना महादेव मुरगोड यांनी सांगितले कि, महात्मा गांधींनी अहिंसा आणि शांतीचा मार्ग स्वीकारणाचे तत्व सांगितले. त्यांच्या या तत्वाला अनुसरून नव्या पेन्शन योजनेला विरोध करण्यासाठी आपण सत्याग्रह पुकारला असून २००६ पूर्वी ज्या पद्धतीने पेन्शन योजना कार्यरत होती, तीच योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली.
यानंतर सरकारी कर्मचारी संघाचे प्रधान सचिव चंद्रशेखर कोलकार म्हणाले, आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे ९१४७ कोटी रुपये कापून घेण्यात आले असून हा पैसे कुठे गेला याची माहिती कुणालाही नाही. कुटुंब पेन्शन योजना देखील आपल्याला योग्यपद्धतीने माहित नाही. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत एनपीएस कडून पैसे मिळाले नाहीत. असा आरोप कोलकार यांनी केला
या आंदोलनात सरकारी कर्मचारी संघाचे प्रधान सचिव जगदीशगौड पाटील, प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी, पदाधिकारी बाबू सोगल्लन्नवर, तारामती हेबळी, आर. व्ही. हैबती, श्रवण रावणनगोळ, रमेश गोणी यांच्यासह इतर सहभागी झाले होते.


Recent Comments