Chikkodi

काँग्रेस पक्षाचा तालिबान्यांना पाठिंबा : महेश टेंगिनकाई यांचा आरोप

Share

काँग्रेस पक्ष तालिबानला पाठिंबा देतो असा आरोप भाजप प्रदेश सरचिटणीस महेश टेंगिनकाई यांनी केला आहे. केवळ तालिबानच नाही तर पाकिस्थानलादेखील पाठिंबा देणारा पक्ष असल्याचे टेंगिनकाई यांनी म्हटले आहे.

: चिकोडी तालुक्यातील करोशी या गावात बूथ अध्यक्षांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बूथ अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष सावित्री एकनाथ जेधे यांच्या निवासस्थानावरील नामफलकाचे अनावरण केले. यावेळी हेस्कॉम संचालक आणि भाजप नेते महेश भाते तसेच करोशी येथील भाजप कार्यकर्त्यांनी सर्वांच्या वतीने महेश टेंगिनकाई यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश टेंगिनकाई म्हणाले, राज्यात भाजपाच्यावतीने ५८ हजार बूथ अध्यक्षांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या नामफलकाचे उदघाटन करण्यात येत असून आज करोशी गावात या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण कर्नाटकात हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. सिद्धरामय्या यांनी भाजपसंदर्भात केलेल्या तालिबान समर्थक वक्तव्याला प्रत्त्युत्तर देताना ते म्हणाले, ज्यांची जी संस्कृती आहे ते त्याच पद्धतीने बोलतात. काँग्रेस पक्ष तालिबान आणि पाकिस्तान समर्थक आहे. यासाठीच देशभरात काँग्रेस संपुष्टात आला आहे. यापुढे राज्यात कोणत्याही देवस्थानाला धक्काही पोहोचणार नाही. यासंदर्भात सभागृहात विधेयक देखील मांडण्यात आले आहे, असे टेंगिनकाई म्हणाले.

यावेळी विभागीय सरचिटणीस प्रकाश आकलकोट, बेळगाव विभागीय सचिव चंद्रशेखर कवटगी, चिकोडी जिल्हा सरचिटणीस राजू कुरडगी, चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, कर्नाटक राज्य सौहार्द सहकारी महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, चिकोडी जिल्हा भाजप महिला अध्यक्षा शाम्भवी अश्वथपूर, चिकोडी जिल्हा महिला सरचिटणीस गीता भाते, ग्रामपंचायत अध्यक्षा सावित्री जेधे, विजय कोठीवाले यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: