Belagavi

ओझोन दिनानिमित्त ‘आरएलएस’मध्ये राष्ट्रीय चर्चासत्र

Share

भूमंडळावर आच्छादित ओझोनचा स्तर पृथ्वी आणि सजीवांचे सूर्याच्या नीलकिरणांपासून रक्षण करतो. परंतु विकासयोजना, तंत्रज्ञान आणि उद्योगांमुळे वातावरणात हानिकारक विषारी रासायनिक द्रव्ये टाकली जात असल्याने वाढते जागतिक तापमान ओझोनचे नुकसान करत आहे असे डीएफओ हर्ष भानू यांनी सांगितले.

बेळगावातील केएलई संस्थेच्या आर. एल. एस. कॉलेजमध्ये गुरुवारी १६ सप्टेंबर जागतिक ओझोन दिनानिमित्त  एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. त्यावेळी बोलताना डीएफओ हर्ष भानू यांनी प्रारंभी पर्यावरण रक्षणाविषयक संत जेडर दासीमय्या यांचे वचन उद्धृत केले. बेळगाव सह्याद्री घाटमाथ्यावर असल्याने आधी येथील वातावरण शीत होते. परंतु वाढते औद्योगिकीकरणामुळे ते बदलले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.

भूमंडळावरील ओझोनच्या स्तरामुळेच अनादी काळापासून पृथ्वी आणि तिच्यावर राहणाऱ्या सजीवांचे संरक्षण होत आले आहे. पुढील पिढ्यांचे असेच रक्षण होण्यात ओझोनच्या पदराचे महत्व असाधारण आहे. त्यामुळे त्याचे आपण रक्षण केले पाहिजे. प्राचार्य डॉ. जे. एस. कवळेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी पी. एस. मेळवंकी, एम. एस. बागी, टी. डी. भेंडे, प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.

 

Tags: