Belagavi

समन्वयाअभावी काँग्रेसने गमवल्या काही जागा : सतीश जारकीहोळी यांची स्पष्ट कबुली

Share

अंतर्गत समन्वयाअभावी बेळगाव महापालिका निवडणुकीत काँग्रेसला काही जागा गमवाव्या लागल्या अशी स्पष्ट कबुली काँग्रेस कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. सतीश जारकीहोळी यांनी पालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा केली. ते म्हणाले, निर्दिष्ट १५ जागांवर काँग्रेसचे तर ५ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून येतील असा आमचा कयास होता. तसे आम्ही हायकमांडला सांगितलेही होते. मात्र आमच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शहरातील ८ जागा आम्हाला गमवाव्या लागल्या अशी कबुली त्यांनी दिली.

बेळगाव उत्तरचे माजी आ. फिरोज सेठ, ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर आणि तुमची शक्ती एकत्र आली असती तर बेळगाव मनपा काँग्रेसच्या ताब्यात आली नसती का? या प्रश्नावर आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, फिरोज सेठ, लक्ष्मी हेब्बाळकर आणि आपल्यात समन्वय नसल्यानेच बेळगाव उत्तरमध्ये ५ तर दक्षिणमध्ये ३ जागा गमवाव्या लागल्या आहेत. हे विधान करून त्यांनी, बेळगावच्या राजकारणात काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नसल्याची जाहीर कबुलीच दिली.

भाजपने आवश्यक बहुमत मिळवून बेळगाव पालिकेची सत्ता ताब्यात घेतली आहे. आता कितीही अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तरी काही उपयोग नाही हे सगळ्यांना ठाऊक झालेले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील या अंतर्गत मतभेदांचा फटका भविष्यातही त्या पक्षालाच बसणार आहे हे मात्र निश्चित !

 

 

 

Tags: