पैशांच्या व्यवहारातून धनदांडग्या खासगी सावकाराने गरीब शेतकऱ्याचा ट्रॅक्टर काढून नेत मानसिक त्रास दिल्याने फेसबुक लाईव्हवर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गोकाक तालुक्यात घडली आहे.

होय, गोकाक तालुक्यातील मक्कळगेरी गावातील लक्ष्मण इळगेरी या ३० वर्षाच्या युवकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यल्लाप्पा गस्ती नामक व्यक्तीवर पैशासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. यल्लप्पाकडून लक्ष्मणने पैसे घेतले होते. एकावेळी २५ हजार रुपये याप्रमाणे त्याने १ लाख रु. दिले तरीही आणखी ३. लाख रु. दे म्हणू यल्लाप्पा त्याचा छळ करत होता. पैसे दिले नाहीत तर तुझे घर, शेत विकून टाकतो, तुझ्या बायको-पोरांनाही सोडणार नाही अशी धमकी यल्लप्पाने लक्ष्मणाला दिली होती.
एवढेच नाही तर यल्लप्पाने ३ महिन्यांपूर्वी लक्ष्मणच्या ट्रॅक्टरही त्याच्या घरासमोरून उचलून नेला आहे. हा मानसिक छळ सहन न झाल्याने लक्ष्मणने फेसबुक लाइव्हवर विष पिऊन आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. लाईव्ह व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला वाचविले आहे.
अत्यवस्थ झालेल्या लक्ष्मनवर सध्या गोकाक तालुका इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी गोकाक पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Recent Comments