अनसुरकर गल्ली येथील कॅपिटल वन सोसायटीच्या वतीने आयोजित १७ व्या एसएसएलसी व्याख्यानमालेचा प्रारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात झाला.

उद्घाटनप्रसंगी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्याख्याते एम. व्ही. भोसले, सुनील लाड, संचालक शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते. यावेळी चेअरमन हंडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाला मिळणाऱ्या सातत्यपूर्ण प्रतिसादाचे कौतुक केले. मागील वर्षी इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल स्नेहा हिरोजी हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद पाटील यांच्या आभारप्रदर्शनाने उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संस्थेचे कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments