लेखक रवी हंज यांच्याविरोधात बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
२६ नोव्हेंबरपर्यंत मार्केट पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लूकआऊट नोटिसमुळे काल कोची विमानतळावर रवी हंज यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले होते. त्यानंतर विमानतळ सुरक्षा यंत्रणेमार्फत नोटीस बजावण्यात आली. तसेच ई-मेलद्वारेही नोटीस पाठविण्यात आली आहे.



Recent Comments