Belagavi

किल्ला तलावाजवळ बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

Share

किल्ला तलावाजवळ बसचे चाक पायावरून गेल्याने एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. समाजसेवक रेस्क्यू टीमने तातडीने मदत करून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सायंकाळी सुमारे ४.१० वाजता ही घटना घडली. बसचे चाक पायावरून गेल्याने ज्येष्ठ नागरिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच समाजसेवक रेस्क्यू टीमचे प्रमुख अवधूत तुडवेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.

रेस्क्यू टीमने दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. असून अशा प्रकारच्या कोणत्याही पद्धतीच्या आपत्कालीन सेवेसाठी 8951047677 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समाजसेवकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: