बेळगावच्या दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिरात सोमवारी कार्तिक स्वामी दर्शनोत्सव होणार आहे. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.
सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजून १५ मिनिटांनी दर्शनाला सुरुवात होणार असून, मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यानंतर विशेष महाआरती करून कार्तिक स्वामी मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राच्या शुभयोगावर स्वामींचा विशेष अभिषेक करण्यात येणार आहे. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या दुर्मिळ दर्शनाचा लाभ महिलांसह सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


Recent Comments