Belagavi

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ वाटप

Share

बेळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली.

शहरातील विविध प्रभागांत कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईचे बॉक्स वितरित करून त्यांच्या सेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

प्रभाग क्रमांक १७, २५, ३३ आणि ३४ मधील सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे बॉक्स देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी देशाच्या सीमेवर पहारा देणारे जवान आणि शहराची स्वच्छता राखणारे सफाई कर्मचारी यांची सेवा अनमोल असल्याचे गौरवोद्गार काढले. शहराच्या स्वच्छतेसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन तसेच महर्षी वाल्मीकी जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमांसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही विश्व हिंदू परिषदेने दिली. या उपक्रमात श्रीकांत कदम, प्रवीण पाटील, डॉ. भाकोजी, हेमंत हावळ यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Tags: