मीरज येथील सचिन हॉस्पिटलमध्ये रविवार, २२ नोव्हेंबर रोजी वंध्यत्व निवारण आणि स्त्री-पुरुष रोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार आहे.

अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येणाऱ्या दाम्पत्यांसाठी या शिबिरात विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. स्त्रियांमधील वंध्यत्व, पुरुषांमधील शुक्राणूंची कमतरता, गर्भाशयातील गाठी, फॅलोपियन ट्यूबमधील अडथळे आणि वारंवार होणारे गर्भपात अशा समस्यांवर आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर दाम्पत्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपचार सुचवतील.
सचिन हॉस्पिटलमधील अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी प्रयोगशाळा (आयव्हीएफ), शुक्राणू बँक तसेच स्त्रीबीज व शुक्राणू दान सुविधांची माहितीही दिली जाणार आहे. लैंगिक समस्या आणि शारीरिक दुर्बलतेवर उपलब्ध उपचारांबाबतही मार्गदर्शन केले जाईल. शिबिरातील प्राथमिक तपासणी मोफत असून, पुढील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी विशेष सवलतीचे दर जाहीर केले जाणार आहेत.
मीरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील हॉटेल प्रियदर्शिनी जवळील सचिन हॉस्पिटलमध्ये हे शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन (९४२२५८०८४२ / ९७६५०१०८३४) किंवा डॉ. नेहा (९४२१९३२४०१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments