Belagavi

श्री बसवेश्वर सहकारी बँकेत सहकार सप्ताह साजरा

Share

७३ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त बेळगावच्या रविवार पेठेतील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात सप्तरंगी सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी बँकेच्या अध्यक्षा सरला शिवानंद हेरेकर म्हणाल्या की, बँकेची स्थापना सहकार तत्त्वांच्या भक्कम पायावर झाली आहे. परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सभासदांचे आर्थिक सक्षमीकरण ही बँकेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. समाजातील वंचित घटकांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनविण्यात सहकारी संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सभासद आणि ग्राहकांचे हित जपत प्रामाणिक सेवा देण्याच्या माध्यमातून बँक अधिक प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष सचिन शिवण्णवर, संचालक रमेश कळसण्णवर, बसवराज उप्पिन, गिरीश बागी, सतीश पाटील, जगदीश खडबडी, निखिल झोंड, दयानंद बाळेकुंद्री, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य राजशेखर चोण्णद, सोमशेखर होम्बळ, महेश उडदार, मुख्य व्यवस्थापक विशालकुमार अंटिन, प्रभारी उपमुख्य व्यवस्थापक कावेरी बनगार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Tags: