बेळगावच्या सदाशिवनगरात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ नागरिकांनी एल अँड टी कार्यालयासमोर एकत्र येत संताप व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी कार्यालयासमोर आंदोलन केले. पाणीपुरवठ्यातील अनियमिततेची माहिती आमदार आसिफ सेठ यांना देण्यात आली. त्यानंतर आमदारांनी प्रसाद चौगुले यांच्याशी संपर्क साधून एल अँड टीचे अधिकारी केतन खांडेकर यांनी वेळेत आणि सुरळीत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

यावेळी जमील देसाई, विनोद बाषघोड, गणपती करकी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments