Belagavi

अपघातात मृत पावलेल्या मोराला अनोखी मानवंदना

Share

बेळगाव शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोराचा मृत्यू झाला. यानंतर वीरेश बसय्या हिरेमठ यांनी वनविभागाला माहिती देत मोराच्या अंत्यविधीसाठी पुढाकार घेतला.

सोमवारी पहाटे ही घटना घडली. माहिती मिळताच सर्वलोका सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वनविभागाचे कर्मचारी अण्णाप्पा आणि विजय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोराच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज अर्पण करून सन्मान व्यक्त केला. त्यानंतर वनविभागाच्या वतीने सन्मानपूर्वक अंत्यविधी करण्यात आला.

Tags: