Belagavi

बेळगावात पेंडाल व इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा

Share

बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे जुना पी. बी. रस्त्यावरील साई भवन येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याला खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, प्रशांत अग्रवाल, सगरभाई चौहान, नारायण चौगुले, भाऊराव मन्नोळकर, महादेव मन्नोळकर, दामोदर रतन आणि परशुराम साळुंके आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. अनिल अंबरोळे यांनी सूत्रसंचालन केले.

या मेळाव्यात पेंडाल व इलेक्ट्रिकल सजावट क्षेत्रातील व्यावसायिक आणि कामगार सहभागी झाले.

Tags: