बेंगळुरू येथे सुरू असलेल्या कर्नाटकच्या पाचव्या राज्यस्तरीय मिनी क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंग प्रकारासाठी बेळगावच्या आरना अभिषेक होसमनी हिची निवड झाली आहे. ५२ किलो वजनी गटात ती बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
कंठीरवा स्टेडियमवर १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा सुरू आहे. आरना ही बेळगावच्या केएलई इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून, मुलींच्या गटात ती सहभागी झाली आहे. तिच्या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



Recent Comments