बेडकिहाळ-गळतगा मार्गावर विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ३६ एकर क्षेत्रावरील ऊस पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या आगीत भाऊसाहेब लट्टी, चंद्रकांत, रवींद्र, अर्चना, सारिका चव्हाण, वसंत, जयवंत, पंढरीनाथ, मुरली बाबर, कांतीनाथ चौगुले, बीर, गजानन काकडे, उत्तम, विलास घोडके, प्रकाश, महेश काकडे, बाबू काकडे, नारायण कडक्कोडे, महावीर, कुमार, अण्णागौडा आणि संतोष पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे.

उसासोबतच शेतातील ठिबक सिंचनाचे पाईप्स आणि केबल्सही जळून खाक झाल्या आहेत. परिसरातील शेतकरी, व्यंकटेश्वर साखर कारखान्याचे कर्मचारी आणि सदलगा अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
ग्रामलेखाधिकारी एस. एन. नेमण्णावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि या घटनेची नोंद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असे सांगितले. हेस्कॉमचे अधिकारी पुजारी व मडिवाळ आणि कृषी अधिकारी काजलगी यांनीही नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आर. जी. मलगौडा पाटील आणि बाळासाहेब शिंदे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.


Recent Comments