शिवानंद कौजलगी यांच्या निधनाने सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बैलहोंगल येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

शिवानंद कौजलगी यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आदरांजली वाहिली. त्यांचे पुत्र आणि आमदार महांतेश कौजलगी यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देत सांत्वन केले.

आमदार, खासदार, मंत्री तसेच केएलई संस्थेचे अध्यक्ष म्हणून शिवानंद कौजलगी यांनी शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात मोलाचे योगदान दिले. त्यांचे कार्य आणि जनहिताची कामे सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.


Recent Comments