Belagavi

हिंदुस्थानी वाद्यसंगीत स्पर्धेत वरुण शेट प्रथम

Share

बेळगाव येथे कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कला प्रतिभोत्सवात वरुण शेट याने हिंदुस्थानी वाद्यसंगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

१५ ते १८ वयोगटातील किशोर विभागात सहभागी झालेल्या वरुणने हार्मोनियम वादनातून परीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्याच्या सुरेल आणि प्रभावी सादरीकरणामुळे त्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

वरुण हा प्रसिद्ध संगीतगुरू पंडित संजय देशपांडे यांचा शिष्य असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो संगीताचे शिक्षण घेत आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून राव, गोरे आणि रोहिणी गंगाधरय्या यांनी काम पाहिले. वरुणच्या यशाबद्दल संगीतप्रेमी आणि हितचिंतकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

Tags: