Belagavi

कॅफेतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूहल्ला

Share

बेळगावच्या सदाशिवनगर परिसरातील एका कॅफेमध्ये आर्थिक व्यवहारावरून सुरू असलेला वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला.

मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सलमान बागेवाडी नामक व्यक्ती जखमी झाली असून, त्याच्यावर बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कॅफेमध्ये चौघा-पाच जणांमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. यावेळी सलमान बागेवाडी यांनी मध्यस्थी करत त्यांना सार्वजनिक ठिकाणी वाद घालण्याऐवजी घरात बसून चर्चा करण्याचा सल्ला दिला. मात्र, यावरून वाद आणखी वाढला आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे समजते.

सबीळ फिरजादे याच्या टोळीने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप जखमी सलमान बागेवाडी यांनी केला आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदाशिवनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tags: