Chikkodi

उसाने भरलेला ट्रॅक्टर घुसला थेट घरात

Share

चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथे समोरील वाहनाला धडक टाळण्याच्या प्रयत्नात उसाने भरलेला ट्रॅक्टर एका घरात घुसला. रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

दोन ट्रेलरमध्ये ऊस भरून जवाहर साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या चालकाने समोरील वाहनाला चुकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो सदलगा येथील शेगणुशी यांच्या घरात घुसला.

अपघाताच्या वेळी घरासमोर दोन जनावरे बांधलेली होती. मात्र, ट्रॅक्टर जनावरांना धडक न देता बाजूने घरात घुसल्याने मोठी दुर्घटना टळली. जनावरांनाही दुखापत झाली नाही.

अपघाताचे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असून, पोलीस तपास करत आहेत.

Tags: