Belagavi

बेळगावात राज्योत्सवाच्या पूर्वसंध्येला दुचाकी रॅलीचे आयोजन

Share

कन्नड राज्योत्सवाच्या पूर्वसंध्येला बेळगाव शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली.

राजोत्सवानिमित्त आज रात्री पासूनच कार्यक्रमाला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर शहरात तयारी करण्यात आली आहे.

राज्योत्सावाच्या पूर्वसंध्येला शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली. महंतेश नगर येथून सुरू झालेली ही रॅली अशोक चौक, कोल्हापूर सर्कल, क्रांतीवीर संगोळी रायाण्णा सर्कल आणि चन्नम्मा सर्कल मार्गे सिरसंगी लिंगराज कॉलेज रस्त्यापर्यंत काढण्यात आली.

कार्यक्रम आणि मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मध्यरात्रीपासून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags: