बेळगाव जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या १३ प्रतिनिधींची कर्नाटक राज्योत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
मुद्रित माध्यम विभागातून द हिंदूचे वरिष्ठ सहायक संपादक हृषिकेश बहाद्दूर देसाई, कन्नडप्रभाचे स्थानिक संपादक ब्रह्मानंद हडगळे, प्रजावाणीचे जिल्हा प्रतिनिधी इमामहुसेन गूडनवर आणि लोकदर्शनचे छायाचित्रकार विश्वनाथ देसाई यांची निवड झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यम विभागातून आर. कन्नडचे जिल्हा प्रतिनिधी मयलारी पटात, चिक्कोडी न्यूज १८ चे प्रतिनिधी लोहित शिरोळ, सुवर्णा न्यूजचे कॅमेरामन अडिवेप्पा पाटील आणि टीव्ही ९ चे कॅमेरामन सदाशिव जाधव यांचा समावेश आहे.
जिल्हा व प्रादेशिक दैनिकांच्या संपादक विभागातून लोकदर्शनचे संपादक शरतचंद्र देसाई आणि कन्नडम्माचे संपादक राजकुमार टोपण्णावर यांची निवड झाली आहे.
तालुका प्रतिनिधी विभागातून विजयवाणीचे अथणी प्रतिनिधी राजू गाली आणि कन्नडप्रभाचे यमकनमर्डी प्रतिनिधी के. एम. कर्नाची यांची निवड करण्यात आली आहे. तर वृत्तपत्र वितरक विभागातून यमकनमर्डी येथील भीमाप्पा कोतेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश असलेल्या निवड समितीने एकमताने या सन्मानार्थींची निवड केली आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या राज्योत्सव सोहळ्यात पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.


Recent Comments