Belagavi

ऊसदर व कारखानदारांच्या समस्यांवर सुवर्णसौधमध्ये मुख्यमंत्र्यांची हायव्होल्टेज बैठक!

Share

गेल्या वर्षी मांडलेल्या मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने साखर कारखाना मालक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत राज्य सरकारने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे मुख्यमंत्री, मंत्री, कारखानदार आणि शेतकरी नेत्यांमध्ये ही महत्त्वाची चर्चा पार पडत आहे.

बेळगावच्या सुवर्णसौधमध्ये साखर कारखाना मालक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडत आहे. गेल्या हंगामात सरकारकडे सादर केलेल्या विविध मागण्यांची अद्याप पूर्तता न झाल्यामुळे कारखानदार आपली भूमिका मांडण्यासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे आणि माजी मंत्री मुरुगेश निराणी यांच्यासह राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांनी सुवर्णसौध येथे उपस्थित राहून साखर उद्योगासमोरील अडचणी आणि ऊसाच्या आधारभूत दराबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

साखर कारखाना मालकांशी झालेल्या बैठकीनंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली. या निर्णायक बैठकीस मंत्री सतीश जारकीहोळी, संतोष लाड, एम. बी. पाटील आणि एस. एस. मल्लिकाअर्जुन उपस्थित असून शेतकरी व कारखानदारांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासोबतच साखर कारखान्यांचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी सरकार सर्वसमावेशक तोडगा काढण्याच्या विचारात आहे.

Tags: