बेळगाव येथे आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती सोहळ्यात आज मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपस्थिती लावली. या प्रसंगी त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या भव्य मिरवणुकीचा औपचारिक शुभारंभ केला.


बेळगाव शहरातील सर्किट हाऊसच्या प्रांगणात आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवाला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी भेट देऊन महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ केला.



या प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी, एस. एस. मल्लिकाअर्जुन, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानसभेचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, आमदार एन. एच. कोनरेड्डी, असिफ (राजू) सेठ, सी. एस. नाडगौडा, महांतेश कौजलगी तसेच विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.



Recent Comments