बेळगाव मधील तानाजी गल्लीस्थित श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात आयुध नवमीनिमित्त श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आयुध नवमीनिमित्त तानाजी गल्ली येथील श्री रेणुका यल्लमा मंदिरातील देवीला आकर्षक आरास करण्यात आली होती. आयुध नवमीनिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


आयुध नवमीचे औचित्य साधून पहाटेपासूनच महाअभिषेक, विशेष पूजा आणि महाआरतीचा धार्मिक विधी पार पडला. बेळगाव शहर व आसपासच्या भागातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर गजबजला होता.

सोहळ्याचे औचित्य साधून श्री रेणुका यल्लम्मा मंदिर समितीतर्फे भव्य महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले. दर्शन रांगेत आलेल्या भाविकांसाठी समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.


Recent Comments