Accident

विजापुरात भीषण अपघात; २ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Share

विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील मुत्तगी क्रॉसजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

राऊत रवी हरिजन (वय २ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात रेणुका आणि यमनव्वा या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद कुडगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर

Tags: