goa

एआयसीसीच्या महिला सरचिटणीसपदी वैशाली सुतार यांची नियुक्ती

Share

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय महिला विभागाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी वैशाली सुतार यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे गोवा राज्य काँग्रेसच्या प्रभारीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. .

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मागासवर्गीय महिला विभागात मोठा बदल करण्यात आला असून, या महत्त्वाच्या पदावर वैशाली सुतार यांची निवड झाली आहे. पक्षसंघटनेत सातत्याने सक्रिय राहून तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणत काम करणाऱ्या त्यांच्या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांना गोवा राज्याची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. गोव्यात महिला आणि मागासवर्गीयांचे प्रश्न आक्रमकपणे मांडून पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पक्षाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वैशाली सुतार यांच्यावर देशभरातून आणि विशेषतः गोव्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काँग्रेस पक्षाच्या विविध स्तरांमधील नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या नव्या जबाबदारीमुळे गोव्यातील काँग्रेस पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tags: