बेळगाव जिल्हा न्यायालय आवारात वाहन पार्किंगच्या विकासकामाचा आज प्रारंभ करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक आणि बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांच्या हस्ते या विकासकामाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बार असोसिएशनचे सरचिटणीस सचिन आर. शिवन्नवर, उपाध्यक्ष पवन पाटील, व्यवस्थापक समितीच्या सदस्या दीपा हळप्पन्नवर, वसंत अक्कन्नवर यांच्यासह इतर समिती सदस्य, वरिष्ठ तसेच कनिष्ठ वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालय आवारातील नियोजित विकासकामाच्या जागेत वाहने पार्क न करता, हे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व वकील आणि पक्षकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन बेळगाव बार असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.


Recent Comments