भारत निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धारवाडमध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.
शहरातील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा वर्तुळ येथे जमलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसआयआरच्या नावाखाली सर्वसामान्य मतदारांच्या हक्कांवर गदा आणली जात असून ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या वेळी एसआयआर प्रकरणावरून लढा उभारणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या अटकेचा कडक शब्दांत निषेध करण्यात आला. ‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’ अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एसआयआर प्रक्रियेतील सर्व कथित घोटाळ्यांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी केली.


Recent Comments