बळ्ळारी आणि विजयनगर जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. दुष्काळ निवारण आणि तातडीच्या उपाययोजनांसाठी सरकारने ३०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

मान्सून आणि परतीच्या पावसाने दांडी मारल्यामुळे राज्यातील ९० टक्के पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पातळीवर वेगाने पावले उचलली जात आहेत.

शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी २५०० रुपये थेट वितरीत करण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत नवीन रस्ते किंवा विकासकामांपेक्षा शेतकऱ्यांचे हित जपण्यालाच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात झालेल्या ४६ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसानापोटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार १० ते ११ हजार कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्राला दोन स्वतंत्र निवेदने पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


Recent Comments