कर्नाटकच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री निश्चितपणे असतील, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मंत्रिमंडळातील महिला प्रतिनिधित्वाबाबत मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायमांड अंतिम निर्णय घेईल. लवकरच याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना त्यांनी यात कोणताही गोंधळ नसल्याचे स्पष्ट केले. निवडणूक आयोग स्वतंत्र असून आम्ही कोणाची नावे वगळण्यासाठी अर्ज केलेले नाहीत, असे जारकीहोळी म्हणाले.
काँग्रेस पक्षाने या विषयावर जनजागृती केली असून, चुकीच्या अर्जांची योग्य पडताळणी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.


Recent Comments