पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाच्या निमित्ताने बेळगाव दक्षिणमधील टिळकवाडी येथील लस डेपो मैदानाजवळ ‘सेवा ज्योत चौका’चे लोकार्पण करण्यात आले. ‘विकसित भारत सेवा संकल्प यात्रे’च्या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानिक आमदार अभय पाटील यांनी भव्य मशाल पेटवून नवीन चौक आणि यात्रेचे उद्घाटन केले. या वेळी खासदार जगदीश शेट्टर, भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

हा चौक कोणत्याही एका पक्षापुरता, समाजापुरता किंवा भाषेपुरता मर्यादित नसून, संपूर्ण देशासाठी तसेच सेवा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांत प्रेरणा देणारा केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन आमदार अभय पाटील यांनी केले.



Recent Comments